
कळंबस्ते येथे साकारत असलेल्या देवराई अंतर्गत बोटॅनिकल गार्डनचा पहिला टप्पा आकार घेऊ लागला
चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या संकल्पनेतून वन विभागाच्या सहकार्याने तसेच आरजीपीपीएल, नेरोलॅक, नाम फाऊंडेशन, क्रेडाई, वाशिष्ठी डेअरी आदींच्या सीएसआर फंडातून कळंबस्ते येथे साकारत असलेल्या देवराई अंतर्गत बोटॅनिकल गार्डनचा पहिला टप्पा आकार घेऊ लागला आहे.या प्रकल्प अंतर्गत लागवड केलेली विविध प्रकारच्या झाडांना फुले बहरू लागली आहेत.
शहरानजीकच्या कळंबस्ते येथे शासनाच्या एका विस्तीर्ण जागेवर देवराई उभारण्याची संकल्पना काही महिन्यांपूर्वी पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी प्रत्यक्ष कृतीत आणण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने नाम फाऊंडेशनचे सहकार्य, वन विभागाचे मार्गदर्शन मिळत असून काही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देवराई उभी करण्यास सुरुवात झाली आहे. निसर्ग, पर्यावरणप्रेमी भाऊ काटदरे यांच्यासह काही पर्यावरणप्रेमींचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे.




