औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये कौशल्यवृद्धीसाठी अल्पमुदत अभ्यासक्रमपंतप्रधानांच्या हस्ते बुधवारी आभासी शुभारंभ


रत्नागिरी, दि.७ ) : जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये कौशल्यवृद्धीसाठी अल्पमुदत अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे रोजगार व स्वयंरोगारासाठी मदत होणार आहे. या अभ्यासक्रमांचा शुभारंभ अभासी पद्धतीने पंतप्रधान महोदयांच्या हस्ते बुधवार दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. हा उद्घाटन कार्यक्रम हा प्रत्येक तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.

या अभ्यासक्रमांमध्ये पारंपारिक तसेच नवयुगीन विविध सव्यंरोजगाराभिमुख अभ्याक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वांनी याचा प्रवेश घेऊन लाभ घ्यावा व त्यासाठी लगतच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट द्यावी व आपला प्रवेश निश्चित करावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button