
TWJ मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारानी तक्रारी दाखल कराव्यात पोलीस दला तर्फे “TWJ असोसिएट्स” बाबत आवाहन
*रत्नागिरी – दिनांक 22/09/2025 रोजी चिपळूण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 216/2025 बी.एन.एस. 2023 चे कलम 316 (2), 318(2), 318(3), 318(4), 3(5) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 चे कलम 3, 4 अन्वये “TWJ असोसिएट्स” यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offence Wing-EOW) करित आहे.
तरी, या द्वारे आवाहन करण्यात येते की, ज्यांची हया कंपनी मध्ये गुंतवणुकीतून फसवणूक झालेली आहे अश्या सर्वांनी तात्काळ रत्नागिरी पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offence Wing-EOW) येथे येऊन आपली तक्रार नोंदवावी.




