
चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक,अपघातात दोघेजण गंभीर जखमी
चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये वेहेळे येथील सुप्रसिद्ध कबड्डीपटू सागर विजय गमरे (वय २६) याचा समावेश असून त्याला अधिक उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर गमरे हा वेहेळे येथून दुचाकीने चिपळूण बाजारपेठेच्या दिशेने येत असताना सती परिसरात समोरून येणाऱ्या पाटील नामक व्यक्तीच्या दुचाकीला त्याची मोटारसायकल धडकली. या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.




