
कोतळूक ग्रामपंचायतीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उत्साहात
गुहागर : तालुक्यातील आदर्श गाव निर्मल ग्रामपंचायत कोतळूक व प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन सरपंच सौ. प्रगती मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोतळूक ग्रामपंचायतीमध्ये श्रमदान, लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात महिलांच्या तपासणी उच्च रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग, लसीकरण सेवा, महिलांना आरोग्य विषयक, पूरक आहाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी, आयुष्यमान वय वंदना कार्डची नोदणी करून घेण्यात आली. एकात्मिक बालविकास योजना विभागाकडून अंगणवाडी सेविका यांनी बनवून आणलेल्या पाककला पदार्थांची माहिती घेऊन चव घेण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थीनींनी यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
यावेळी उपसरपंच सचिन ओक, ग्रामपंचायत सदस्य सचिन भेकरे, लक्ष्मण वरकर, ग्रामपंचायत अधिकारी कमलाकर शिरकर, डॉ. सुर्यवंशी, आरोग्य निरीक्षक जांभळे, समुदाय आरोग्य अधिकारी नयना शेळके, अक्षय गडगे, आरोग्य सेविका निधी लाकडे, श्रीमती कुलकर्णी, आरोग्य सेवक आकाश खिल्लारे, आशा गट प्रवर्तक श्रीमती सोलकर, लॅब टेक्निशियन साईप्रसाद गावडे, कोतळूक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका उपस्थित होत्या.




