KSC लोहपुरुष स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन आणि कोकण ट्रायथलिट क्लब चे खेळाडू चमकले

अभिजीत पड्याळ आणि रुचिरा जाधव-साळवी यांनी ड्युओथलॉन मध्ये मिळवले पोडियम. विनायक पावसकर यांची ट्रायथलॉन मधे चमकदार कामगिरी

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रैक्टिस रन आणि कोकण ट्रायथलिट क्लब च्या माध्यमातून कोकणामध्ये आणि रत्नागिरी शहरामध्ये स्पोर्ट्स कल्चर वृद्धिंगत होऊ लागले आहे.

नुकत्याच कोल्हापूर इथे झालेल्या KSC ट्रायथलॉन स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रॅक्टिस रन आणि कोकण ट्रायथलीट क्लब च्या माध्यमातून २५ पेक्षा जास्त धावपटू,सायकलपटू, जलतरणपटू सहभागी झाले होते. या तीनही क्लब मध्ये ऍक्टिव्ह असलेले डॉक्टर नितीन सनगर या उपक्रमाचे इव्हेंट अँबॅसिडर होते.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब चे सायकलपटू दररोज रत्नागिरी तसेच आजूबाजूच्या संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये रपेट मारत असतात.
नित्यनिरन्तरगतिशीला: या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब ची वाटचाल सुरु आहे.

कोकणामध्ये मॅरेथॉन ची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या माध्यमातून सायकलिंग ला रनिंग ची जोड मिळते आहे. दर रविवारची प्रॅक्टिस रन म्हणजे सर्व वयोगटातील धावपटूंसाठी एक पर्वणी ठरते आहे.

यालाच जोड मिळाली आहे कोकण ट्रायथलीट क्लब ची ज्याच्या माध्यमातून ट्रायथलॉन तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंग वर लक्ष केंद्रित करून ट्रायथलॉन साठी कोकणवासीय तयार होत आहेत.

KSC ड्युओथलॉन ट्रायथलॉन स्पर्धेत
अभिजित पड्याळ आणि रुचिरा जाधव साळवी यांनी ड्युओथलॉन प्रकारात पोडियम फिनिश केला
विनायक पावसकर यांनी देखील ओलीम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली , अगदी थोड्या फरकाने त्यांचे पोडियम हुकले

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या ग्रुप राईड च्या माध्यमातून सायकल राईड, कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या प्रॅक्टिस रन च्या माध्यमातून रनिंग प्रॅक्टिस, कोकण ट्रायथलीट क्लब च्या माध्यमातून कोअर ट्रेनिंग तसेच ट्रायथलॉन ट्रेनिंग चा सराव या सर्वानी केला

इतर सर्व सहभागी स्पर्धकांनी देखील आपापल्या क्रीडाप्रकारात निर्धारित वेळेत फिनिश लाईन पार करत या KSC ड्युओथलॉन आणि ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.

सदर ट्रायथलॉन तसेच ड्युओथलॉन स्पर्धेत कुटुंबाच मोलाचं सहकार्य लाभल्यामुळेच ही कामगिरी करता आल्याचं अभिजीत पड्याळ, रुचिरा जाधव-साळवी , विनयक पावसकर तसेच सर्व सहभागी खेळाडू नी व्यक्त केले.

सर्व रत्नागिरीकरांकडून सहभागी क्रीडापटूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button