
राज ठाकरे पत्नीसह उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी…
महानगरपालिका निवडणुका काही आठवड्यांवर येवून ठेपल्या आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती लवकरच जाहीर होणार, अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.आज (दि. ५ ऑक्टोबर) पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मागील चार महिन्यांत राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाचवी भेट असल्याने ठाकरे बंधुंच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे तिघे एकत्र होते. संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू हे आज संजय राऊत यांच्या एका कौटुंबीक कार्यक्रमात एकत्र आले. यानंतर राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर पोहोचले. आज दुसऱ्यांना राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं गेला आला होता.संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम झाल्यानंतर राज ठाकरे पत्नीसह उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले. सुमारे अर्धा तासपेक्षा जास्त वेळ ते ‘मातोश्री’मध्ये होते. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये यावेळी जवळपास अर्धातास चर्चा झाली. यानंतर राज ठाकरे ‘मातोश्री’ येथून आपल्या घरासाठी रवाना झाले.




