
रस्त्यावर कचरा फेकाल तर नगरपरिषद कारवाई करणार, रस्त्यात कचरा फेकणार्यांवर आता सीसीटीव्हीमार्फत वॉच
खेड नगर परिषदेने स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छोत्सव मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एकीकडे स्वच्छता कर्मचार्यांचे हात स्वच्छतेसाठी दिवसभर राबत असताना दुसरीकडे मात्र भर रस्त्यात कचरा फेकून स्वच्छताविषयकच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. यामुळे भर रस्त्यात कचरा फेकणार्यांवर सीसीटीव्ही कॅमेर्यांचा वॉच राहणार आहे. दीपावलीनंतर कार्यवाही केली जाणार आहे. बेशिस्तपणे वागणार्या नागरिकांना दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे.
जागेअभावी कचरा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. अशाही परिस्थितीत मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपुर्या बळातही शहरातून दिवसाकाठी जमा होणार्या कचर्याची योग्य तर्हेने विल्हेवाट लावून शहर चकाचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.www.konkantoday.com




