
रत्नागिरी पाठोपाठ चिपळूण शहरातही रस्त्यांवरील खड्ड्यासाठी कोल्ड मिक्सचा प्रयोग
बोगस कामामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पडणार्या खड्ड्यांवर नगर परिषदेने ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातून बुधवारी चिंचनाका येथील काही खड्डे कोल्ड मिक्सने भरण्यात आले आहेत. ही चाचणी नाशिक येथील गोल्डन ड्रॉप कंपनीने घेतली. त्यामुळे हे खड्डे उखडले नाहीत तर याच पद्धतीने सर्व खड्डे भरले जाणार आहेत. गेल्या आठ दिवसात याचा अंतिम निर्णय होणार आहे.
नागरिक व वाहन चालकांना त्रास होवू नये म्हणून नगर परिषदेने करोडो रुपये खर्च करून मार्कंडी ते बहाद्दूरशेखनाका, गुहागरनाका ते उक्ताड, गुहागरनाका ते मच्छीमार्केट, चिंचनाका ते पॉवरहाऊस, वडनाका, गोवळकोट रोड, आदी भागातील मुख्य व अनेक अंतर्गत रस्ते तयार केले आहेत. यातील बरेच रस्ते वॉरंटीमध्ये असतानाही खराब झाले आहेत.www.konkantoday.com




