
रत्नागिरीत दसर्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा मोठा उत्साह
जीएसटीचे दर कमी केल्यामुळे ऐन दसर्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. साडेतीनपैकी एक मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी हजारो वाहनांची खरेदी केली आहे. यात सर्वाधिक हिरो, होंडा डिलक्स, टीव्हीएस, जुपिटर, तर चारचाकीमध्ये मारुती व ह्युंदाई या चारचाकींची खरेदी केल्याची नोंद रत्नागिरी आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे.दरम्यान, इलेक्ट्रिक वाहने खरेदीला यंदा रत्नागिरीकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांची बुकिंग झाली आहे.
दसर्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीकर सोने, चांदीनंतर वाहन खरेदीला दरवर्षी मोठी पसंती देतात. दसर्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक असून यादिवशी मोठ्या संख्येने वाहन खरेदी होत असते




