दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल 1 हजार 329 वाहनांची नोंदणी झाली असून, आहे.उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागाला त्यातून 5 कोटींहून अधिक महसूल मिळाला

जीएसटीचे दर कमी केल्यामुळे दसर्‍याच्या मुहूर्तावर रत्नागिरीत वाहनखरेदीत उत्साह पाहायला मिळाला. साडेतीनपैकी एक असलेल्या या सुमुहूर्तावर रत्नागिरीकरांनी हजारो वाहनांची खरेदी केली आहे.उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागात एकूण 1 हजार 329 वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून 5 कोटी 1 लाख 78 हजार 382 इतका शासकीय महसूल आरटीओ कार्यालयास प्राप्त झाला आहे.

दसर्‍याच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी सोने -चांदीनंतर वाहन खरेदीलाही पसंती दिली. यावेळी रत्नागिरीवासीयांनी मोठ्या उत्साहात वाहनांची खरेदी केली. दसर्‍यासाठी 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रीक वाहनांची बुकिंग झाले.

दसर्‍याच्या दिवशी पूजा करून वाहन घरी नेले. दरम्यान, मागील आठवड्याभरापासून वाहनांची नोंदणी वेळेत व्हावी आणि रत्नागिरीकरांना वाहने वेळेत मिळावीत याकरिता रत्नागिरी आरटीओ कार्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. तब्बल 1 हजार 329 वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून 5 कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. त्यापैकी 4 कोटी 76 लाख 42 हजार 382 नोंदणी शुल्क व करातून तर उर्वरित 232 वाहनांच्या आकर्षक क्रमांक शुल्कातून 25 लाख 36 हजार रक्कम शासनास जमा झाली आहेदुचाकी, स्कूटर- 887

अ‍ॅडॅप्टेड व्हेईकल-2

चारचाकी- 289

रिक्षा- 81

गुड्स- 61

मोटारकॅप-3

रुग्णवाहिका-1

डंपर-3

एकूण- 1329

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button