
चिपळुणातील पुरस्थितीवर नियंत्रण सुचविणारा मोडक समिती अहवाल अखेर ३ वर्षांनी स्वीकारला
कोळकेवाडी भरण, त्यातून सोडण्यात येणारे अवजल आणि चिपळुणात पूर परिस्थिती निर्माण करणार्या अन्य कारणांचा शोध घेऊन पूर नियंत्रणाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत मुख्य अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त अभ्यास गटाचा अहवाल तब्बल ३ वर्षानंतर शासनाने स्वीकारला आहे. या संदर्भातील शासन आदेश जलसंपदा विभागाने बुधवारी जारी केली. यातील १७ पैकी १६ शिफारशींना अंशतः मान्यता दिली आहे.
www.konkantoday.com



