
आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी गुहागर समुद्रकिनार्याची निवड
आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील ५ समुद्रकिनार्यांची घोषणा पर्यावरण विभाग व पर्यटन संचालनालय यांनी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनार्याबरोबर दापोलीतील लाडघर समुद्रकिनार्याचाही समावेश आहे. यामुळे दसर्याच्या मुहूर्तावर गुहागरच्या पर्यटन वाढीसाठी सुखवार्ता प्राप्त झाली आहे. या वर्ष अखेरपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या समुद्रकिनार्यांना भेट देणार आहेत.
ब्ल्यू फ्लॅग राष्ट्रीय ज्युरी सदस्य व राष्ट्रीय ऑपरेटर यांनी महाराष्ट्रातील १० समुद्रकिनार्यांची पाहणी केली होती. त्यापैकी या पाहणीनंतर केलेल्या मूल्यांकनातून सन २०२५-२६ या हंगामासाठी पाच समुद्रकिनार्यांची ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा प्रदान केला आहे यामध्ये डहाणूमधील पारनाका बीच, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व नागाव बीच तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर बीच यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसाठी मुख्यमंत्र्यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून मुख्यमंत्री स्वतः या प्रकल्पाकडे लक्ष देणार आहेत.www.konkantoday.com




