
१०२ वर्षांच्या विजया राजवाडकर यांचे निधन
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि रविकिरण उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रवि राजवाडकर यांच्या मातोश्री विजया वामन राजवाडकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय १०२ वर्षे होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यात आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून सन्मार्गावर लावले.त्या अतिशय शांत ,प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांनी कुटुंबीयांबरोबरच आपल्या सर्व नातेवाईकांना आपलेसे करण्याचे आणि गावातील लोकांशी ही आपुलकीचे नाते निर्माण करून आपले नावलौकिक मिळवले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांचे सर्व नातेवाईक, गावातील आणि विविध ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्य यात्रेसाठी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन मुलगे रवि आणि कुमार, मुली माया आणि राजश्री, नातवंडे ,सुना असा परिवार आहे.




