
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात ६ ऑक्टोबर रोजी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.
सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा ८ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा, दुपारी १२.३० वाजता आरती होईल. त्यानंतर दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.




