
मंगेश लोके यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी तालुक्यातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तालुका प्रमुख पदावर नंदू शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर मंगेश लोके यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.मंगेश लोके हे यापूर्वी पंचायत समिती सदस्य राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा दांडगा आहे. ठाकरे गटाचे राजन तेली यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला भाजपाने दुसरा दणका दिला आहे.




