
परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांबरोबर एसटी महामंडळालाही प्रवासी घटल्याने मोठा फटका
राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. नद्यांना आलेला पूर, रस्त्यांवर साचलेले पाणी व पूरस्थितीमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली.परिणामी, मुंबईतून ये-जा करणाऱ्या एसटी बसच्या शेकडो फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
महामंडळाला गेल्या तीन महिन्यांपासून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आता तर मुसळधार पावसामुळे दररोज सरासरी तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, असे सूत्रांनी सांगितले. ८३.५२ लाख प्रवासी सप्टेंबरच्या सुरुवातीला घटले




