
खेड तालुक्यातील धामणदेवी गावातील भंगार चोरीचा माल भंगारातच विकताना रंगेहाथ सापडले
खेड तालुक्यातील धामणदेवी गावातील एका हॉटेल जवळील भंगाराच्या गोडावूनमधून सुमारे ६४ हजार रुपये किंमतीचे एम.एस. पत्र्याचे ६४ सीट चोरीला गेल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी घडली होती. चोरट्याने तो माल विक्रीसाठी थेट चिपळुणातील एका भंगार व्यापार्याकडे आणला होता. याबाबतची खबर मिळताच तक्रारदार व त्यांच्या साथीदारांनी थेट चिपळूण गाठत या चोरट्यांना ऍपेरिक्षा टेम्पोसह रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना चिपळूण पालीस स्थानक व तेथून खेड पोलीस स्थानकात या गुन्ह्याची नोंद करून या चोरीप्रकरणी दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चिपळुणात या प्रकरणी चौकशी करताना संबंधित गाडी चालकाने आणखी काहींची नावे या भंगार चोरीत घेतल्याने चिपळूण-खेडमध्ये एखादी टोळी सक्रीय असावी, असा दाट संशय निर्माण झाला आहे. मंदार शाम हुमणे (रा. परशुराम दुर्गेवाडी, ता. चिपळूण), संकेत महाडीक (रा. पाली, ता. खेड) असे खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.www.konkantoday.com




