
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे आज शुक्रवारी सायंकाळी कुडाळ येथून पर्यटनासाठी आलेल्या परिवारातील 8 इसम समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी रोजी कित्तूर कुटुंब, लोंढा, बेळगाव येथील व मनियार कुटुंब , गुडीपुर, कुडाळ येथील असे दोन कुटुंब पर्यटनासाठी शिरोडा वेळाघर या ठिकाणी आले होते.सदर परिवारातील 8 इसम हे समुद्रात पाण्यात हाताची साखळी करून खेळत असताना. सुमारे 5.45 वाचता अचानक मोठी लाट येऊन त्यापैकी ७ जणांना पाण्यात खेचून गेली. यामधील तीनजण मयत झाले असून त्यांचे मृतदेह सापडले असून 4 जण अद्याप बेपत्ता आहेत. एक मुलगी नामे इसरा इम्रान कित्तूर वय 17 वर्षे (जिवंत आहे) वाचली असून तिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.
या घटनेमध्ये फरीन इरफान कित्तूर वय 34 वर्षे, इबाद इरफान कित्तूर वय 13 वर्षे, सर्व राहणार लोंढा, बेळगाव. नमीरा आफताब अखतार वय 16 वर्षे, राहणार, लोढा, जिल्हा बेळगाव हे 3 जण मयत झाले आहेत.तर इरफान मोहम्मद इसाक कित्तूर वय 36 वर्षे, इकवान इमरान कित्तूर वय 15 वर्षे दोन्ही राहणार, लोंढा बेळगाव . फराहान महम्मद मणियार वय 25 वर्षे ,गुडीपूर, कुडाळ.जाकीर निसार मणियार वय 13 वर्षे राहणार, गुडीपूर, कुडाळ हे 4 जण समुद्रात बेपत्ता आहेत.
सदर समुद्रात बेपत्ता 4 इसमांचा शोध अंधार पडेपर्यंत स्थानिक बोटींच्या साह्याने घेतला असता ते अद्याप मिळून आलेले नाहीत. समुद्र खवळलेला असल्या कारणामुळे अंधार पडला असल्यामुळे शोध मोहीम थांबवलेली आहे.उद्या पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे




