
रत्नदुर्ग येथे उत्साहात गडपूजन सोहळा
रत्नागिरी : “आधी तोरण गडाला, मग घराला” या संकल्पनेतर्गत गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाच्या वतीने रत्नदुर्ग किल्ल्यावरील महादरवजाजवळ गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याची सुरुवात आई भगवती देवीची पूजा करून करण्यात आली. यानंतर महादरवजाला पारंपरिक पद्धतीने तोरण बांधण्यात आले. या कार्यक्रमाला गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे विभाग अध्यक्ष दीपेश वारंग, विभाग प्रमुख मयूर भितळे, संपर्क प्रमुख तन्मय जाधव, संस्कृतिक विभाग प्रमुख समृद्धी चळके, संपर्क प्रमुख पालवी रसाळ, रणरागिनी खुशी गोताड, रुचि गोताड, सेजल मेस्त्री, रश्मी जाधव, श्वेता भितळे यांच्यासह गड सेवक नयन कदम, शुभम आग्रे, आकाश जोगलेकर, सूरज खोचाडे आदी उपस्थित होते.
यावेळी रत्नदुर्ग किल्ल्याचे ग्रामस्थ, स्थानिक नागरिक, तसेच भाजपाचे कार्यकर्ते रमाकांत आयरे, शुभांगिनी जाधव, शशिकांत जाधव यांच्यासह जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, महाराष्ट्रचे सचिव केदार चव्हाण, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, परशुराम शिंदे उपस्थित होते. त्याचबरोबर श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान रत्नागिरी विभागाचे अमित काटे, जयदीप साळवी, समीर सावंत, अमेय पाडवे, ऋषिकेश गुरव, चैतन्य कोळवणकर आदी सदस्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
इतिहासप्रेमी केतकी सावंत, जयेश शिवलकर यांच्यासह संस्थेतील अनेक मावळे व रणरागिणींच्या उपस्थितीमुळे सोहळ्यास विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
हा गडपूजन सोहळा गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. समृद्धी चळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी जनमानसामध्ये गडकोटांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व पोहोचविणे आणि सर्वांनी सक्रियपणे शिवकार्य करावे असा संदेश देण्यात आला.




