मुंबई गोवा महामार्गावर लिफ्ट मागणाऱ्या महिलेला कार मध्ये बसवून तिला लुटण्याचा प्रयत्न, महिलेने धाडस दाखवून करून घेतली सुटका


मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. कोदवली बस स्टॉप वरून लिफ्ट मागणाऱ्या महिलेला कार मध्ये बसवून तिला राजापुरात न उतरता पुढे नेत तिला लुटण्याचा प्रयत्न कारचालकाने केला.मात्र या महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे ती बचावली आहे.

दरम्यान या झटापटीत कारचालकाने या महिलेच्या डोक्यात रॉड घातल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. दरम्यान कालचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कोदवली येथे राहणाऱ्या रश्मी चव्हाण या गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कोदवली येथून राजापूरला जाण्यासाठी कोदवली बस स्टॉप वर उभ्या होत्या.

त्यांनी मुंबईकडून येणाऱ्या एका कारला हात दाखवला. कार चालकाने त्यांना लिफ्ट दिली. मात्र कार चालकाने त्यांना राजापुरात न उतरतात तो त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या सोबत काहीतरी अघटीत घडतेय याची कल्पना चव्हाण यांना आली. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार चालकाने त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जोरदार प्रतिकार केला याला चव्हाण यांनी जोरदार प्रतिकार केला.

दरम्यान महामार्गावरील मोठ्या पुलाच्या पुढील रस्त्यावर त्यांनी गाडीतून दरवाजा उघडून उडी मारली. दरम्यान त्यांच्यामध्ये गाडीत झालेल्या झटापतीट कार चालकाने त्यांच्या डोक्यात रॉड मारल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चव्हाण यांनी गाडीतून उडी मारल्यानंतर हा कारचालक पुन्हा गाडी मागे वळवून मुंबईच्या दिशेने फरार झाला आहे.

गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चव्हाण यांना तात्काळ स्थानिक रिक्षाचालक व ग्रामस्थांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी तात्काळ राजापूर पोलिसांनी दखल घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button