
पोस्ट ऑफीस मार्फत परदेशात फराळ पाठविण्याची सुविधा
रत्नागिरी दि. ०३ :- जिल्ह्यातील अनेक मुले तसेच नागरिक शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात आहेत. त्यांना दिवाळीत आपल्या घरचा फराळ मिळावा यासाठी पोस्ट ऑफीस मार्फत परदेशात फराळ पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
फराळ परदेशात पाठविण्यासाठी काही निवडक देशांसाठी ५ किलो पार्सलचे दर पुढीलप्रमाणे आहेत. ऑस्ट्रेलिया ४ हजार ९९७ रुपये, कॅनडा ५ हजार २६ रुपये, यु.ए.ई. १ हजार ८९९ रुपये, यु.के. ४ हजार ५३७ रुपये आणि जर्मनी ३ हजार ६९९ रुपये. या देशाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये पार्सल पाठविता येईल. त्यासाठी इच्छुकांनी नजीकच्या पोस्ट ऑफीसला संपर्क करावा, असे डाकघर अधीक्षक ए.डी. सरंगले यांनी कळविले आहे. रत्नागिरी व चिपळूण प्रधान डाकघर येथे फराळ पॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे.




