
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार 8 ऑक्टोबर रत्नागिरीत
रत्नागिरी, दि. 3 ):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्हचे 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था यांचे कार्यालय, नाचणे रोड, एमआयडीसी, रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
जिल्हयातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी रोजगार विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. 8 ऑक्टोबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये मुलाखतीकरीता स्वत:चा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी होणेसाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी.
000




