
नापत्ता व्यक्तींबाबत पोलीसांचे निवेदन
रत्नागिरी, दि. 3 ) : जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून काही नागरिक नापत्ता झाल्याची माहिती पुढे येत आहे. तरी नापत्ता झालेल्या व्यक्तींविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जयश्री मधुकर तामुंडकर वय 69 वर्षे या चिपळूण तालुक्यातील पोसरे येथून 9 सप्टेंबर 2025 पासून नापत्ता आहेत. सदर नापत्ता महिलेला स्मृतीभ्रंश आजार असून रंग गव्हाळ, उंची 5 फूट, चेहरा उभट, नेसणीस फिक्कट गुलाबी रंगाची साडी, बांधा सडपातळ, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे सफेद, पायात चांदीची जोडवी, कानात सोन्याच्या धातूच्या कुड्या, गळ्यात सोन्याचे लहान मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या असे वर्णन आहे.
अनिता विजय ठाकूर वय 40 वर्षे या साईसंकल्प नगर, आदर्श वसाहत, कारवांची वाडी, रत्नागिरी येथून 6 सप्टेंबर 2025 पासून नापत्ता आहेत. सदर महिलेचे वर्णन रंग सावळा, उंची 4 फूट 5 इंच, केस काळे, बांधा मध्यम, बोलीभाषा मराठी, डोळे काळे, नाक सरळ, गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, नेसणीस आकाशी रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाऊज, पायात पांढऱ्या रंगाची चप्पल, हातामध्ये दोन प्लास्टिक पिशव्या त्यामध्ये एक आकाशी रंगाचे भजनाचे पुस्तक आहे.




