
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडून बसणार्या फेरीवाल्यांना रत्नागिरी न.प.कडून ’अल्टिमेटम’
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडून बसणार्या फेरीवाले, टपरीधारक व भाजीविक्रेत्यांना रत्नागिरी नगरपरिषदेने नोटीस बजावली आहे. या सर्व व्यावसायिकांना आपले विहीत परवाने तसेच रहिवासी पुराव्याची कागदपत्रे १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कागदपत्रांची छाननी करून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांवरील परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी मनसेसह विविध संघटनांनी नगरपरिषदेकडे केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने कारवाईचा प्रारंभ केला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी विजय कदम यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व हातगाडीधारक, फेरीवाले, टपरीधारक व भाजीविक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावर उपाय म्हणून नगरपरिषदेच्या मालमत्ता विभागाने सर्व व्यावसायिकांकडून आधारकार्ड, पनकार्ड, परवाने व अन्य कागदपत्रे मागवली आहेत. कागदपत्रांच्ची छाननी झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com




