
रत्नागिरी जिल्ह्यातील ४७६ जि.प.शाळांमध्ये शिक्षिका नसल्याने विद्यार्थीनींसमोर पेच
राज्यात जिल्हा परिषदेच्या १५ हजारांहून अधिक प्राथमिक शाळांमध्ये एकही शिक्षिका कार्यरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील ४७६ शाळांचा समावेश आहे. या गंभीर समस्येमुळे विशेषतः विद्यार्थिनींचे वैयक्तिक प्रश्न आणि अडचणी मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न उभा राहिला आहे.
राज्यातील २४ जिल्ह्यांची उपलब्ध आकडेवारी पाहिल्यास ११ हजार ५८६ शाळांमध्ये शिक्षिकाच नसल्याचे चित्र आहे. यात रत्नागिरी जिल्ह्याचा आकडाही चिंताजनक आहे. जिल्ह्यातील ४७६ जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षिका नसल्याची माहिती समोर आली आहे ज्यामुळे तेथील मुलींना त्यांचे खासगी, आरोग्यविषयक किंवा नातेसंबंधातील गुंतागुंतीचे प्रश्न विश्वासाने मांडण्यासाठी कोणी उपलब्ध नसल्याची बाब यानिमित्ताने समोर येत आहे.
www.konkantoday.com




