
नगराध्यक्षपद किंवा पं. स. सभापतीपद मिळाल्यावरच महायुती टिकेल, भाजप दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे मत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या – निवडणुकीसाठी राजकीय घडामोडी वेग पकडू लागल्या आहेत. सर्व पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले असून, भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी स्पष्ट केले की, रत्नागिरीचे नगराध्यक्षपद किंवा पंचायत समितीचे सभापतीपद भाजपाला मिळाले पाहिजे, त्यानंतरच महायुती युती टिकेल.
पंचायत समितीचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर झाले. यामध्ये रत्नागिरी पंचायत समितीसाठी सभापतीपदे सर्वसाधारण ठरले आहेत. त्यामुळे भाजपाला तालुक्याचे प्रथमपद किंवा शहराचे नगराध्यक्षपद मिळणे आवश्यक असल्याचे पक्षाचे मत आहे. गतवेळी रत्नागिरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनाचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी विजयी झाले होते, तर भाजप दुसर्या क्रमांकावर होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस तिसर्या क्रमांकावर राहिले. या निवडणुकीनंतर शिवसेनो दुभगंल्यामुळे दोन गट तयार झाले. तत्कालीन नगराध्यक्ष बंड्या साळवी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत राहिले, तरीही रत्नागिरी शहरात शिवसेनेची ताकद उबाठाची आहे.
राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, रत्नागिरीत महाविकास आघाडी आणि शिवसेना विरोधात भाजप अशी तिरंगी लढत झाल्यास शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. भाजपाने गतनिवडणुकीत दुसर्या क्रमांकाची मते मिळवली होती, त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजपाला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील निवडणुकांमध्ये सर्व पक्ष आपला ठसा उमठवण्यासाठी सज्ज झाले आहेत.www.konkantoday.com




