
ढिसाळ नियोजनामुळे रत्नागिरी एसटी महामंडळाच्या वाहतुकीचा बट्ट्याबोळ
जुन्या ’स्क्रॅपप’ बसगाड्या आणि ढिसाळ नियोजनामुळे रत्नागिरी एसटी महामंडळाचा वाहतूक कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अनेक शहरी व ग्रामीण बस फेर्या वारंवार रद्द होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. संतापलेले प्रवासी लवकरच याविषयी पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अनेक बस फेर्या अचानक रद्द होत असल्यामुळे प्रवाशांचा प्रचंड खोळंबा होत आहे. प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही, त्यामुळे तासन्तास बसस्थानकावर थांबून राहिल्यानंतर बस रद्द झाल्याचे समजते. यामुळे प्रवाशांमध्ये महामंडळाच्या कारभाराबद्दल संतापाची लाट पसरली आहे.
सर्वात जास्त गैरसोय शाळकरी विद्यार्थ्यांची होत आहे. शाळेच्या वेळेतील अनेक महत्वाच्या फेर्या अचानक रद्द केल्या जात आहेत. सकाळी शाळेत जाण्यासाठी ’किंवा सायंकाळी शाळेतून घरी परतण्यासाठी विद्यार्थ्यांना बस मिळत नाहीत. त्यामुळे शहरातील शाळांमधून ग्रामीण भागात जाणार्या विद्यार्थ्यांची सायंकाळच्या वेळेत मोठी परवड होत आहे.
www.konkantoday.com




