
गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्या चिपळुणातील टीडब्ल्यूजे कार्यालयाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून पंचनामा
दाम दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची करोडोंची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टीडब्ल्यूजे कंपनीवर यवतमाळ पाठोपाठ चिपळुणातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार पोलिसांनी या कंपनीची कसून चौकशी करण्यास सुरूवात केली असून मंगळवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीच्या पोलिसांनी चिपळूणमध्ये येऊन गुहागर बायपास मार्गालगतच्या कंपनीच्या चिपळूण शाखेचा पंचनामा केला.
तब्बल तीन तास ही कारवाई सुरू होती. राज्यभर कंपनीवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरू झाल्याने कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
टीडब्ल्यूजेचे सीएमडी समीर नार्यकर, संचालक नेहा नार्वेकर, चिपळूणा व्यवस्थापक सिद्धेश कदम, संकेश घाग या चौघांविरूद्ध २९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. कामथे येथील प्रतीक दिलीप माटे यांनी चिपळूण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार टीडब्ल्यूजेवर गुन्हा दाखल झाला आहे.www.konkantoday.com




