
2 व 3 ऑक्टोबर रोजी वाहतूक मार्गात बदलभुतेनाका-भंडगतिठा ते मांडवी मार्गावरील वाहतूक बंदभुते नाका-मिरकरवाडा तिठा-मत्स्यालय ते नाईक फॅक्टरी मार्गे पर्यायी मार्ग
रत्नागिरी, दि.1) : 2 ऑक्टोबर व 3 ऑक्टोबर 2025 रोजी शहरातील दुर्गादेवींचे विसर्जन मांडवी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी दुपारी 3 ते रात्रौ 12 वाजेपर्यंत भुतेनाका-भंडगतिठा ते मांडवी या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली असून, भुते नाका-मिरकरवाडा तिठा-मत्स्यालय- ते नाईक फॅक्टरी मार्गे या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरु राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिध्द केली आहे.
या अधिसूचनेत म्हटले आहे, 2 ऑक्टोबर व 3 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गादेवी मूर्ती विसर्जन होणार आहे. मांडवी समुद्रकिनारी मूर्ती विसर्जनाकरीता अंदाजे पाच ते सहा हजार जनसमुदाय एकत्रित येत असतात. अशावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतात. त्यामुळे जे भाविक देवीमूर्ती विसर्जनासाठी वाहने घेवून येणार आहेत त्याच वाहनांना आत प्रवेश देवून अन्य वाहनांना प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री महोदय यांच्या दौ-याच्या अनुषंगाने परवानगी दिलेली वाहने यांना लागू होणार नाही.




