0 ते 18 या वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरांचे आयोजन३ आॕक्टोबरपासून होणार सुरु


रत्नागिरी, दि. 1 ):- विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 0 ते 18 या वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरांचे आयोजन बाल न्याय समिती, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, आर. आर. पाटील यांनी दिली. या शिबिरापासून कोणतेही गरजू व पात्र बालक वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित अंगणवाडी सेविका व विशेष शिक्षिका यांनी घ्यावी, अशा सूचना अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व्ही. वाय. जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या आहेत.
या शिबिरामध्ये शारीरिक / बौद्धिक / विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या 0 ते 18 या वयोगटातील बालकांची युनिक डिसअॅबिलीटी आयडी कार्ड (UDID) करिता तपासणी करण्यात येऊन हे कार्ड वितरित करण्यात येणार आहे. जेणेकरून या बालकांना आवश्यक व पात्रतेनुसार सहाय्यक साधने वितरीत करता येतील. या शिबिरात दिव्यांग बालकांसाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात येईल. शिबिरांचे वेळापत्रक- शुक्रवार 3 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय लांजा,
शनिवार 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय राजापूर, सोमवार 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय देवरुख, मंगळवार 7 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय गुहागर, बुधवार 8 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 वाजता शासकीय रुग्णालय रत्नागिरी, गुरुवार 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कामथे आरोग्य केंद्र, मंगळवार 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय खेड, बुधवार 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय मंडणगड आणि गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय दापोली.
या शिबिरात बालकांना आणण्यापूर्वी लांजा व राजापूर तालुक्यातील दिव्यांगांनी ग्रामीण रुग्णालय पाली, गुहागर तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय गुहागर, चिपळूण व संगमेश्वर तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कामथे, खेड व मंडणगड तालुक्यांकरिता उपजिल्हा रुग्णालय खेड, दापोली तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली आणि रत्नागिरी तालुक्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी या प्रमाणे www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करताना सेंटरची निवड करावयाची आहे. नाव नोंदणी करीता काही अडचण आल्यास जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी 9834440200 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क करावा. तपासणी करिता सोबत संकेतस्थळावर नाव नोंदणी केल्याची प्रत, आधार कार्ड प्रत, आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक, जिल्ह्यातील रेशनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button