
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ झाराप तिठा येथे दुचाकी व कार यांचा भीषण अपघातात दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ झाराप तिठा येथे दुचाकी व कार यांचा मंगळवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या राज पेडणेकर (वय 15, साळगाव, नाईकवाडी) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. लहू पेडणेकर व सोहम परब हे दोनजण गंभीर झाले आहेत. दोघाही जखमीना गोव्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थानी जवळपास एक तास महामार्ग रोखून धरला होता. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह काही काळ महामार्गावरच ठेवत संतप्त भावना व्यक्त केल्याने दोन्ही बाजूची वाहतूक थांबली होती.त्यानंतर घटनास्थळी तहसीलदार व पोलीस तात्काळ दाखल झाले व मार्ग मोकळा करण्यात आला.




