
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रत्नागिरीचा स्वरुप काणे याला राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रासाठी कार्यरत असणारे स्वरुप काणे यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे.
पदवीधर प्रकोष्ठ शिक्षक आघाडी व आदर्श शैक्षणिक समूह नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवीन पनवेल येथील धनराजजी विसपुते सभागृहात नुकताच पार पडला. या स्पर्धेत स्वरुप काणे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे मंदिर बांधकाम व धार्मिक कार्य या विषयावर निबंध लिहिला होता.www.konkantoday.com




