
रत्नागिरी शहरातील पटवर्धनवाडी येथून तरुण बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार
रत्नागिरी शहरातील पटवर्धनवाडी येथून तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अली फारुख सुर्वे (३०, रा. पटवर्धनवाडी रत्नागिरी) असे बेपत्ताचे नाव आहे. याप्रकरणी फैमिदा सुर्वे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अली हा २४ सप्टेंबर २०२५ रोजी राहत्या घरातून अचानक कुठेतरी निघून गेला. यानंतर तो घरी न परतल्याने पत्नी फैमिदा यांनी नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडे चौकशी केली. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागू शकला नाही. अखेर फैमिदा सुर्वे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com




