
रत्नागिरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताला जामीन
रत्नागिरी तालुक्यातील १५ वर्षीय मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करणार्या संशयिताची सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. वैभव सदाशिव परपटे (४१) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वैभव याला अटक करण्यात आली होती.
गुन्ह्यातील माहितीनुसार पीडित मुलगी ही १६ मे रोजी संशयित वैभव याच्या घरी वैयक्तिक कामासाठी आली होती. यावेळी वैभव याने तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच १७ मे रोजी पुन्हा पीडिता ही वैभव याच्या घरी आली असता वैभवने जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच घडला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी वैभव याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. वैभव याने रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.www.konkantoday.com




