
रत्नागिरीतील थिबा राजा कालीन बुद्धविहाराला राजकीय, सामाजिक संघटनांचा पाठिंबा
रत्नागिरी शहरानजिक थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने बुद्धविहार संघर्षाची माहिती देण्याकरिता २७ सप्टेंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला बहुसंख्य राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या चर्चासत्राचा विषय शांतताप्रिय रत्नागिरी अशांत होऊ नये असा ठेवण्यात आला होता. सामाजिक व राजकीस पदाधिकार्यांनी बुद्धविहाराच्या संघर्षाला आपला पाठिंबा दर्शविला. थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने कार्याध्यक्ष एल. व्ही. पवार, सदस्य अनंत सावंत यांनी संघर्ष समितीची भूमिका उपस्थितांसमोर मांडली.
या भूमिकेला प्रतिसाद म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने विजय देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने युवा नेते नौशीद काझी, अशोक भटकर (बामसेफ) यांनी या लढ्यात संघर्ष करताना रणनीती कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच संघटनांच्यावतीने या बुद्धविहार लढ्यास पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.www.konkantoday.com




