
बळीराजावरील पुराचे संकट लवकरच दूर होऊ दे, ना. योगेश कदम यांचे श्री काळजादेवीला साकडे
श्री देवी काळकाई प्रत्येक संकटात मक्तांच्या पाठीशी उभी आहे. तशीच या महाराष्ट्रावरे आलेल्या अस्मानी संकटात देखील आधार देत शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहून बळीराजावरील पुराचे संकट लवकरच दूर होऊ दे, असे साकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भरणे येथील श्री काळकाई देवीला घातले.
मराठवाड्यात उदभवलेल्या पूरस्थितीची सलग ४ दिवस पाहणी केल्यानंतर गृहराज्यमंत्री शनिवारी सायंकाळी येथे आले असता भरणे येथील श्री देवी काळकाईच्या चरणी नतमस्तक झाले. श्री काळकाई देवीचे दर्शन घेत त्यांनी आशीर्वाद घेतले. सपत्नीक काळकाई देवीची आरतीही केली. देवस्थानच्या वतीने अध्यक्ष महेश जगदाळे, सचिव प्रशांत चव्हाण व मानकर्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
लातूर तालुक्यातील साखरा, मांजरी, मुरूड, अकोले गावात पाहणीदौरा करत नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर दिला. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी नुकसानीचे पंचनामे, सर्वेक्षण काळजीपूर्वक करावे, पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचेही मंत्री कदम यांनी सांगितले. बळीराजावर आलेले अतिवृष्टी व पुराचे संकट लवकर दूर होऊन माझा महाराष्ट्र पुन्हा सुखी अन् समृद्ध होवू दे, असे साकडे देवीला त्यांनी घातले.www.konkantoday.com




