प्रवाशांना दिवाळीचा मोठा झटका! एसटीचे तिकीट 10% महागले;


राज्यभरातील लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीतील गर्दीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसचे तिकीट 10 टक्क्यांनी वाढणार आहे.ही भाडेवाढ 15 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2025 पर्यंत तब्बल 22 दिवस लागू राहील. विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांनी ॲडव्हान्स बुकिंग केले आहे, त्यांना देखील जुना आणि नवीन दरातील फरक वाहकाकडे जमा करावा लागेल, असे परिपत्रक MSRTC ने जारी केले आहे.

किती दिवस भाडेवाढ लागू?

15 ऑक्टोबर 2025 पासून ही भाडेवाढ लागू होईल आणि ती 05 नोव्हेंबर 2025 पर्यंत कायम राहील. म्हणजेच तब्बल 22 दिवस ही दरवाढ तिकीट दरांवर परिणाम करणार आहे. सर्वसामान्य साधी, जलद बससेवांसोबतच निमआराम, साधी शयनयान (स्लीपर), शिवशाही आणि जनशिवनेरी यांसारख्या लोकप्रिय सेवांवर ही दरवाढ लागू होणार आहे.

15 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 00.00 वाजल्यापासून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना वाढीव दर लागू होतील.
ॲडव्हान्स बुकिंग (Advance Booking): ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे, त्यांना वाहकाकडे जुना आणि नवीन तिकीट दर यातील फरक जमा करावा लागेल.
पासेस आणि सवलत: विद्यार्थी पासेस (Student Passes) आणि मासिक-त्रैमासिक पासेस (Monthly-Quarterly Passes) वापरणाऱ्यांना ही भाडेवाढ लागू होणार नाही. मात्र, इतर सामाजिक घटकांना मिळणाऱ्या सवलतीच्या तिकीटांसाठी (Concessional Tickets) देखील ही 10 टक्क्यांची दरवाढ लागू असेल.

प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे वातानुकूलित शिवनेरी , 09 मीटर आणि 12 मीटर ई-बसेस (शिवाई) या सेवांच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बसच्या दरात वाढ न झाल्याने या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button