
धामणी ग्रामपंचायतीच्या स्वच्छ मिशन कारभारात घोटाळा; अधिकारी सक्तीच्या रजेवर
धामणी ग्रामपंचायतमध्ये वॉटर कुलर, किचन कट्टा, विहिरींवरील जाळ्या, खेळाचे साहित्य, लॅपटॉप, प्रिंटर, घरघंटी आदी वस्तुंच्या खरेदी दाखवून एकही वस्तू ग्रामपंचायतमध्ये नाही हा गंभीर प्रकार आहे. याची आमसभेत जोरदार खडाजंगी झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याचे आदेश आ. शेखर निकम यांनी दिले.
धामणी ग्रामपंचायतच्या स्वच्छ भारत मिशनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अधिकारी नेमून तातडीने कारवाई करावी, असे पत्र दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी गटविकास अधिकारी यांनी देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही नाही याबाबत प्रवीण गुरव, श्रीनिवास पेंडसे यांनी मुद्दा आमसभेत उपस्थित केला. याबाबत कार्यवाहीचे आदेश आमदारांनी दिले.www.konkantoday.com




