
एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशल फेर्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
दसरा, दीपावली व छटपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर २५ सप्टेंबरपासून चालवण्यात येत असलेल्या एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशल फेर्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. स्पेशल २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार असून येथील स्थानकात देण्यात आलेल्या थांब्यामुळे खेडसह दापोली, मंडणगड तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एलटीटी-तिरुवअनंतपूर साप्ताहिक स्पेशल दर गुरुवारी धावते. एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसर्या दिवशी रात्री १०.१५ वाजता तिरुवअनंतपूरम येथे पोहोचते. परतीच्या प्रवासात दर शनिवारी धावणारी स्पेशल तिरुवअनंतपूरम येथून सायंकाळी ४.२० वाजता सुटून तिसर्या दिवशी मध्यरात्री १ वाजता एलटीटीला पोहोचते.
२२ डब्यांच्या स्पेशलला कोकण मार्गावर पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळीं, मडगाव स्थानकात थांबे आहेत. या स्पेशलमुळे नवरात्रोत्सवात कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होत आहे.www.konkantoday.com




