‘स्वराभिषेक’ची मंगळवारी दिवाळी पहाट मैफल

सम्राज्ञी शेलार यांचे गायन; जयेश मंगल पार्कमध्ये आयोजन

रत्नागिरी : येथील स्वराभिषेक संस्था आणि जयेश मंगल पार्कतर्फे येत्या मंगळवारी (ता. २१) दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले. आहे. यामध्ये स्वराभिषेकचे शिष्य शास्त्रीय, सुगम गायन सादर करणार असून गोव्यातील प्रसिद्ध गायिका सम्राज्ञी आईर-शेलार यांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे.
थिबा पॅलेस रोडवरील जयेश मंगल पार्क येथे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ही मैफल होईल. स्वराभिषेकच्या सौ. विनया परब यांच्या संगीत संयोजनाखाली त्यांचा शिष्यवर्ग शास्त्रीय, भावगीत, अभंग, भक्तीगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीते सादर करणार आहे. त्यांच्यासमवेत मैफल रंगवणाऱ्या सम्राज्ञी शेलार यांचे संगीताचे प्रारंभिक शिक्षण शास्त्रीय गायिका डॉ. शिल्पा डुबळे परब यांच्याकडे झाले असून पं. सुधाकर करंदीकर, डॉ. हनुमंत बुरली, डॉ. शशांक मक्तेदार, पं. कमलाकर नाईक, राया कोरगावकर यांच्याचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी सुरश्री केसरबाई केरकर संगीत संमेलन, मोगुबाई कुर्डीकर संगीत संमेलन, पं. जितेंद्र अभिषेकी संगीत संमेलनासह अशा अनेक नामवंत कार्यक्रमांमध्ये गायन सादर केले आहे. त्यांना आकाशवाणी बी. श्रेणी प्राप्त असून गोवा सरकारचा युवा सृजन पुरस्कार मिळाला आहे. सध्या त्या गोवा कला अकादमीत संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या मैफलीला मैफलीला संवादिनीसाथ महेश दामले, कीबोर्डची साथ मंगेश मोरे, तबलासाथ केदार लिंगायत, पखवाजवाज मंगेश चव्हाण, बासरीसाथ मंदार जोशी आणि तालवाद्याची साथ अद्वैत मोरे आहे. मधुरा लाकडे, दीप्ती आगाशे आणि मनाली नाईक या निवेदन करणार आहेत. तसेच ध्वनिसंयोजन एस. कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत यांचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button