सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; दापोलीत व्हेलची उलटी जप्त


वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे उल्लंघन करून ‘अंबरग्रीस’ची अवैध वाहतूक आणि विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर दापोली सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विश्वसनीय माहितीच्या आधारे १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे केलेल्या शोध मोहिमेत ४ किलो ८३३ ग्रॅम वजनाचे ‘अंबरग्रीस’ जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

​सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला ‘अंबरग्रीस’ची (व्हेलची उलटी) अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, दापोली येथील एस. टी. स्टँडजवळ एका मारुती वॅगन आर वाहनाचा पाठलाग करून ते अडवण्यात आले.

​वाहनाच्या तपासणीदरम्यान, पांढऱ्या रंगाच्या छटा असलेले तपकिरी रंगाचे घन पदार्थ – म्हणजेच ४ किलो ८३३ ग्रॅम वजनाचे ‘अंबरग्रीस’ जप्त करण्यात आले. हे ‘अंबरग्रीस’ सुगंधी द्रव्यांमध्ये वापरले जाते आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असते, परंतु वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे त्याची विक्री प्रतिबंधित आहे. अवैध वाहतुकीसाठी वापरलेले मारुती वॅगन आर वाहन देखील जप्त करण्यात आले. तसेच, या कृत्यात सामील असलेल्या चार लोकांना ताब्यात घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button