सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात20 फूट खोल ओहोळात कार कोसळली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका वॅगनार कारचा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या २० फूट खोल ओहोळात कोसळली.सुदैवाने, या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साटेली-भेडशी येथील एक युवक आपल्या वॅगनार कारने दोडामार्ग शहरातून घरी परतत होता. दरम्यान, ओहोळावळील वळणावर आल्यानंतर त्याला समोरून एक दुचाकी चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येताना दिसली.

दुचाकीस्वाराला धडक बसू नये म्हणून चालकाने गाडी वळवली, मात्र तोल जाऊन कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे २० फूट खोल ओहोळात कोसळली.अपघात इतका भीषण होता की कारचे दरवाजे अडकले, मात्र मागचा दरवाजा तुटल्याने चालक त्यातून बाहेर पडू शकला. चालकाला किरकोळ दुखापती झाल्या असून त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button