संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार


कवीकुलगुरू कालिदास सस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार श्री ऑरोबिंदो योग अँड नॉलेज फाउंडेशनकडून आणि द प्रोग्रेस ग्लोबल ऍवार्ड्स २०२५ अंतर्गत देण्यात आला आहे.
आपल्या कार्य कौशल्याच्या बळावर, भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व रत्नागिरीतील जनमानसापर्यंत पोहोचवले. गेली ४ वर्षे सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन उपकेंद्राद्वारे यशस्वीपणे करण्यात येत आहे. शहरवासियांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button