
शिक्षण विभागाच्या नव्या आदेशामुळे अधिकारी आणि शिक्षक संभ्रमावस्थेत
उपसचिवांच्या या परिपत्रकानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्यांनी २० ऑक्टोबरच्या पटसंख्येनुसार संचमान्यता निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधीपासूनच निश्चित असलेली प्रक्रिया पूर्णतः बदलली आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांनी आधीच ३० सप्टेंबरचा डेटा अपलोड केला आहे. आता २० ऑक्टोबरचा पट सादर करण्याचे आदेश मिळाल्याने अधिकारी आणि शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत.
ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये सॉफ्टवेअर प्रणालीत बदल करणे, विद्यार्थ्यांची हजेरी, पडताळणे आणि आकडेवारीची पुन्हा तपासणी करावी लागणार आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे प्रशासकीय गोंधळ वाढला असून शिक्षकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आणि भविष्याची चिंता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com




