शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वररोजगाराभिमुख अल्प मुदत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. 6 ) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे असोसिएट इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), सुईंग मशीन, ऑपरेटर (टेलरिंग), प्लंबर जनरल (नळकारागिर), फोअर व्हीलर सर्व्हिस असिस्टंट (चार चाकी वाहन दुरुस्ती) हे रोजगाराभिमुख अल्पमुदत अभ्यासक्रम अल्प फी आकारून चालू करण्यात येत आहेत. तरी या सुवर्णसंधीचा फायदा आपण घ्यावा. अधिक माहितीसाठी ०२३५४-२९९३४२, ७०२०८५५९३७, ९५८८४६७६६१, ९७६४४५८५९८, ९४२१२२९३७१ या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वरचे प्राचार्यांनी केले आहे. प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील ४०० पेक्षा अधिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते दिनांक ०८ ऑक्टोबर दुपारी ३ वाजता होणार
आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button