
वालावलकर रूग्णालयात वर्षभरात सर्पदंशाच्या ६५ गंभीर रुग्णांना जीवदान
दरवर्षी पावसाळ्यात व भात कापणीच्या दरम्यान ऑक्टोबर महिन्यात कापणी आणि अतिउष्ण हवामानात सर्प व विंचू बाहेर पडतात. यामुळे सर्प, विंचूदंशाचे प्रमाण अधिक असते. गेल्या वर्षभरात सर्प दंशाचे तब्बल ६५ गंभीर रुग्ण वालावलकर रुग्णालयात दाखल झाले होते. या सर्वच रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना सुखरुप घरी सोडण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
साप चावल्यामुळे रुग्णालयात काखल झालेल्या रुणांना प्रथम भीती आणि जग हळू हळू श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हात पायाची शक्ती क्षीण होत गेली. डोळ्यांच्या पापण्या जड झाल्या आणि मग मात्र श्वास सुद्धा घेणे अवघड झाले. त्यामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बेशुद्ध झाले. प्रयत्न करुनही पापणी सुद्धा उघडता येत नव्हती. अशा आवस्थेतून गंभीर रुग्णांवर रुग्णालयात यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला यश आले आहे.
ऑक्टोबर महिन्यात भात कापणीच्या दरम्यान शेतकरी शतात असतात आणि त्यावेळी भात कापल्यामुळे आणि अतिउष्ण हवामानामुळे सर्प व विंचू बाहेर पडतात आणि सर्प-विंचूदंशाचे प्रमाण वाढते. त्यामुळे यावेळी शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सर्पदंश किंवा बिचू दंश झालेल्या सर्व रुग्णांना वालावलकर रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ देण्यात आला आहे.www.konkantoday.com




