वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटीलचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला


रत्नागिरी जिल्ह्याला हादरवून सोडणार्‍या वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. दुर्वासचा बाप दर्शन पाटील याच्या निधनानंतर उत्तरकार्यासाठी सत्र न्यायालयापुढे तीनही खून प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी दुर्वास याचे तीनही अर्ज निकाली काढत न्यायालयाने जामीन देण्यास नकार दर्शवला.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. दुर्वास पाटील याच्यावर प्रेयसी भक्ती मयेकर, सीताराम वीर व राकेश जंगम या तिघांचा खून केल्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्ती मयेकर खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत. तर सीताराम वीर व यांच्या खून प्रकरणाचा गुन्हा जयगड पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button