राज्यातील शाळांना १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी


दिवाळीपूर्वीच्या सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत. काही शाळांच्या परीक्षा सुरूही झाल्या आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडतील. त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागतील.

१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी असणार आहे.

शैक्षणिक वर्षात ५२ रविवारी शाळांना सुट्टी असते. याशिवाय शाळांना सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने अशा ७६ सार्वजनिक सुट्ट्यादेखील असतात. शैक्षणिक वर्षातील राहिलेल्या २३७ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन होते. दरम्यान, यंदा जिल्हा परिषदेसह महापालिका, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना १२ दिवस दिवाळी सुट्टी असणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी २ मे ते १३ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुट्ट्या असतील. तत्पूर्वी, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button