
राजापूर पोलीस ठाण्यातर्फे एकता दौडचे आयोजन
राजापूर : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज (३१ ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने ‘एकता दौड’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये राजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी ५ किमी अंतर चालून आणि धावून पूर्ण केले. यामध्ये ४ अधिकारी ३० अंमलदारांसह एक शिक्षक सहभागी झाले होते. पाऊस असल्यामुळे नागरीकांची ची संख्या कमी होती.
या दौडीला सकाळी ६.४५ वाजता राजापूर पोलीस ठाणे येथून प्रारंभ झाला. सकाळी ८ वाजता दौडची समाप्ती करण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.




